Rajan Salvi: शिवसेना पक्षप्रवेशाआधी साळवींचा राऊतांवर घणाघात, सगळंच सागितलं
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सामंत बंधू यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर आमदार राजन साळवी हे शिवसेना शिंदे पक्षात प्रवेश करत आहेत. याचपार्श्वभूमिवर राजन साळवी यांनी त्यांची पहिली प्रतिक्रिया लोकशाही मराठीला दिली आहे.
राजन साळवी म्हणाले की, "गेले 38 वर्ष मी रत्नागिरीमध्ये जिल्हाध्यक्ष, जिल्हाप्रमुख आणि नगरसेवक आहे. २०२४ चा पराभव माझ्या जिव्हारी लागला. या निवडणुकीत माझ्या पक्षातीलच नेत्यांनी माझ्या विरुद्ध काम केलं. विनायक राऊत आणि त्यांचे सहकारी हेच माझ्या प्रभावाला कारणीभूत असून त्यांच्यामुळे मी पक्ष सोडत आहे. विनायक राऊत यांनी माझ्याविरोधात काम केलं. मी याबद्दल पुर्ण माहिती शिवसेना उद्धव ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिली आहे".
पुढे राजन साळवी म्हणाले की, "एकनाथ शिंदे यांनी आम्हाला तिघांना सुद्धा समजवून सांगितल की ही शिवसेना आपल्याला वाढवायची आहे. आदित्य ठाकरे हे शिवसेनेचे नेते आहेत अशा मोठ्या नेत्याबद्दल छोट्या कार्यकर्त्याने बोलणं उचित वाटत नाही. माझ्या मतदार संघातील माणसांना न्याय द्यायचा असेल तर मला योग्य तो निर्णय घेतला पाहिजे, अस मी बोललो होतो".
"त्यामुळे आता मी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला आहे. कोणत्याही चौकशीला आम्ही घबरात नाही, तेव्हाही मी घाबरलो नाही आणि आता ही मी घाबरत नाही. चौकशी केली तरी मी सहकार्य करेल आणि मला खात्री आहे मी निर्दोष असेन. जेव्हा निवडणूका असतात तेव्हा आरोप होत असतात, अशी प्रतिक्रिया राजन साळवी यांनी दिली".