समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंह यादव यांचे निधन

समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंह यादव यांचे निधन

समाजवादीचे पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांचे आज निधन झाले आहे. ते 82 वर्षांचे होते. मेदांता रुग्णालयात मुलायम सिंह यादव यांनी अखेरचा श्वास घेतला.
Published on

नवी दिल्ली : समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांचे आज निधन झाले आहे. ते 82 वर्षांचे होते. मेदांता रुग्णालयात मुलायम सिंह यादव यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचा सुपुत्र आणि उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी ट्विटरवरुन ही माहिती दिली आहे.

मागील काही दिवसांपासून मुलायम सिंह यादव मेदांता रुग्णालयात दाखल होते. 2 ऑक्टोबर रोजी मूत्रमार्गात संसर्ग, रक्तदाबाची समस्या आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर त्यांच्यावर आयसीमध्ये उपचार सुरु होते. परंतु, प्रकृतीत फारशी सुधारणा झाली नाही. आज अखेर मुलायम सिंह यादवांची प्राणज्योत मालवली.

मुलायम सिंह यादव यांचा नपुरी मतदारसंघातून लोकसभेचे खासदार होते्. उत्तर प्रदेशचे राजकारण असो, देशाचे राजकारण असो, मुलायमसिंह यादव यांची गणना प्रमुख नेत्यांमध्ये केली जाते. ते तीन वेळा यूपीचे मुख्यमंत्री होते आणि केंद्र सरकारमध्ये संरक्षण मंत्रीही राहिले आहेत. याशिवाय मुलायम सिंह 8 वेळा आमदार आणि 7 वेळा लोकसभा खासदार म्हणून निवडून आले आहेत.

५ दशकांची राजकीय कारकीर्द

1967, 1974, 1977, 1985, 1989, 1991, 1993 आणि 1996 - 8 वेळा आमदार .

1977 - उत्तर प्रदेश सरकारमध्ये सहकार आणि पशुसंवर्धन मंत्री होते. ते लोकदल उत्तर प्रदेशचे अध्यक्षही होते.

1980 मध्ये जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष

1982-85 - विधान परिषदेचे सदस्य

1985-87 - उत्तर प्रदेश विधानसभेतील विरोधी पक्षनेते

१९८९-९१ - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री

1992 - समाजवादी पक्षाची स्थापना

1993-95- उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री

1996- खासदार

1996-98 - संरक्षण मंत्री

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com