राजकारण
समरजित घाटगे आज राजकीय भूमिका जाहीर करणार
समरजित घाटगे आज राजकीय भूमिका जाहीर करणार असल्याची माहिती मिळत आहे.
समरजित घाटगे आज राजकीय भूमिका जाहीर करणार असल्याची माहिती मिळत आहे. भाजपचे समरजित घाटगे हाती तुतारी घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. समरजितसिंह घाटगे यांनी आज कार्यकर्त्यांचा मेळावा कागलमध्ये आयोजित केला आहे.
या कार्यकर्त्यांचा मेळाव्यातून समरजित घाटगे त्यांची राजकीय भूमिका जाहीर करणार असल्याची माहिती मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे.
समरजित घाटगे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाकडून कागलची उमेदवारी दिली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता समरजित घाटगे काय भूमिका जाहीर करतात हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.