"आम्ही फक्त जोडे मारा आंदोलन करतोय, शिवाजी महाराजांचा काळ असता तर...", संजय राऊत आक्रमक
आज शिवद्रोही सरकार आहे. त्या विरोधात राज्यभर आंदोलन होईल. सुरुवात मुंबईकडून होईल. ज्या पद्धतीने या राज्यात सातत्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होतो आहे. एक राज्यपाल होते महोदय भगतसिंग कोश्यारी त्यांनी अपमान केला, मग त्यांनी माफी मागितली. काही मंत्र्यांनी केला त्यांनी माफी मागितली. सध्याचे मंत्री दीपक केसरकर म्हणतात पुतळा तुटला त्याचं दुःख कशाला करायचं? शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळतो तुमच्या भ्रष्टाचारामुळे हे त्यातून चांगलं घडतंय. ही यांची विकृती आणि मनोवृत्ती. मालवणचा पुतळा जो कोसळला सिंधुदुर्ग किल्ल्यावरचा हा सरळ भ्रष्टाचार आहे. आपापल्या लोकांना कामं देण्याचं ही स्पर्धा आहे. त्यातून हा पुतळा कोसळला. प्रधानमंत्र्यांनी माफी मागितली असेल हा त्यांचा प्रश्न आहे किंवा आता मुख्यमंत्री असतील, अजितदादा पवार असतील किंवा त्यांचे इतर काही सहकारी असतील कारण माफी मागून हा प्रश्न सुटणारा नाही. या संदर्भात महाराष्ट्राद्वारे त्यांना त्यांच्या भावना व्यक्त करायचे असतील, तर तुम्ही महाराष्ट्राला थांबवू शकत नाही. आज फक्त तुमचा निषेध करण्याचा आंदोलन आहे. लोकशाहीमध्ये अशा प्रकारच्या आंदोलनाला परवानगी द्यावीच लागते. तुम्ही जर ती देणार नसाल तर ही तुमची दडपशाही आहे, झुंडशाही आहे.
ज्या भागात हे आंदोलन होतं आहे, तो संपूर्ण भाग सुट्टीमुळे बंद आहे. तरीही आंदोलनाला तुम्ही परवानगी देत नसाल, तर तुमच्या मनामध्ये हुकूमशाहीची एक वृत्ती आहे ती वाढलेली आहे. आम्ही फक्त जोडे मारो आंदोलन करतोय, शिवाजी महाराजांचा काळ असता तर तुमचा कडेलोट केला असता. मी आता पाहिलं की आता आम्ही आंदोलन करतोय म्हणून हे भाजपचे लोकं आंदोलन करतायेत. हा हास्यस्पद मूर्खपणा आहे. आम्ही छत्रपती शिवजी महाराजांच्या प्रतिष्ठेसाठी आंदोलन करतोय आणि हे आमच्या विरोधामध्ये आंदोलन करतायेत. यांची डोकी फिरलेली आहेत मी वारंवार म्हणतो. शिवाजी महाराजांचा अपमान झाला, शिवाजी महाराजांचा मान, सन्मान आणि प्रतिष्ठा यासाठी आम्ही आंदोलन करतोय आणि भारतीय जनता पक्षाची मूर्ख हे आमच्या विरोधामध्ये आंदोलन करतायेत. हे यांचं शिवप्रेम. पोलिसांनी जरी परवानगी नाकारली असली तरी 11 वाजता माननीय शरद पवार साहेब, माननीय उद्धव ठाकरे साहेब, काँग्रेसचे प्रांताध्यक्ष सन्माननीय नाना पटोलेजी आम्ही सगळे आणि हजारो महाविकास आघाडीचे कार्यकर्ते हे पोहोचतील आणि आमचं आंदोलन सुरु होईल. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात ठिकठिकाणी सातत्याने हे आंदोलन सुरु राहिल.
आज लोकल ट्रेनचा मेगाब्लॉक आहे पाच तास. त्याच्यामुळे लोकं ट्रेननी प्रवास करणार नाही आज मुद्दाम मेगाब्लॉक वाढवला आहे कार्यकर्ते पोहचू नये म्हणून मेगाब्लॉक वाढवलं आहे. तर आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना वाहनाने यायला सांगितलं. आज सकाळी 7 वाजल्यापासुन पाहतोय आमच्या वाहनांना अटकाव केला जात आहे, ते जेव्हा निघतायेत त्यांना थांबवलं जातं आहे. हे भय का? तुम्ही आम्हाला साधं आंदोलन करु देत नाही महाराष्ट्रात ते सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानासाठी. तुम्हाला शिवाजी महाराज हे नाव घ्यायाचा अधिकार नाही.