Sanjay Raut Team Lokshahi
राजकारण
जामीन मिळताच संजय राऊत होतायत ट्विटरवर ट्रेंड! कार्यकर्ते म्हणतायत, 'टायगर इज बॅक'
तब्बल 102 दिवसांनतर तुरुंगाबाहेर, त्यामुळे राज्यभर ठाकरे गटाकडून जोरदार जल्लोष
मागील अनेक महिन्यांपासून शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत हे गोरेगाव पत्राचाळ घोटाळा प्रकरणात कोठडीत होते. मात्र, आता पीएमएल कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे संजय राऊत यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या बातमीमुळे ठाकरे गटात राज्यभर उत्साहाचे वातावरण आहे. ठिकठिकाणी जल्लोष साजरा करण्यात येत आहे. परंतु, सोशल मीडियावर सुद्धा संजय राऊत झळकता आहे. ट्विटरवर तर संजय राऊत ट्रेंड करत आहेत. ठाकरे गटाकडून 'टायगर इज बॅक' असा पोस्ट केल्या जात आहे.