राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का? राऊतांनी सरळ सांगितले...

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का? राऊतांनी सरळ सांगितले...

महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठा भूकंप झाला.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठा भूकंप झाला. २ जुलै २०२३ या दिवशी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी शपथ घेतली. या घडामोडीनंतर आता अजून एक चर्चा रंगली आहे. ती म्हणजे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार? या चर्चांना उधाण आले आहे.

याच पार्श्वभूमीवर आता संजय राऊत म्हणाले की, गेली 22 वर्ष विचारला जात आहे. ज्या प्रकारची हुकूमशाही, दडपशाही सुरू आहे. पैशाचं राजकारण सुरू आहे. अनेक दगडांवर पाय ठेवून आता कुणालाही महाराष्ट्रात राजकारण करता येणार नाही. शिवसेना झुकली नाही, वाकली नाही. जे डरपोक होते. ते पळून गेले. जे स्वार्थी होते ते पळून गेले. ही महाराष्ट्राची ओळख पुसायची असेल तर या प्रवृत्ती विरुद्ध ज्यांची मनापासून आणि प्रामाणिकपणे लढण्याची इच्छा आहे. असे राऊत म्हणाले.

तसेच राज ठाकरे आणि आमचे संबंध चांगले आहेत. आमच्या मनात आलं तर आम्ही त्यांना थेट फोन करू शकतो, त्यासाठी मध्यस्थाची गरज नाही, असं सांगतानाच ज्यांना देश आणि राज्याच्या भल्यासाठी एकत्र यावं वाटत असेल त्यांनी सर्व किल्मिषं दूर करून एकत्र आलं पाहिजे. असे राऊत म्हणाले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com