Sanjay Raut : दरोडे कसे टाकण्यात आले यावर आज महापत्रकार परिषद
ठाकरे गटाकडून आज महापत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. या पत्रकार परिषदेत नेमकं कोणते मुद्दे उपस्थित केले जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. या पत्रकार परिषदेमध्ये नेमके कोणते गौप्यस्फोट केले जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. संजय राऊत म्हणाले की, हिंमत असेल तर पक्ष काढा आणि चालवा. दरोडे कसे टाकण्यात आले त्यावर आज महापत्रकार परिषद आहे. खुली पत्रकार परिषद घेण्याची हिंमत नार्वेकर, शिंदेंनी दाखवावी. देशातील पत्रकारांना खुलं आवाहन या आणि प्रश्न विचारा.
महापत्रकार परिषदेतून नार्वेकरांच्या निकालाची पोलखोल होणार. कायदेत्ज्ञ महापत्रकार परिषदेला उपस्थित राहणार. मोदींनी एक पत्रकार परिषद घेण्याची हिंमत दाखवावी. तिजोरीची लूट करुन मुख्यमंत्री आणि त्यांच्या टीमचा दावोस दौरा. सरकारी पैशातून दावोसची सहल. देशात भाजपपीठ मोदी त्याचे शंकराचार्य. असे संजय राऊत म्हणाले.