Sanjay Raut : अमित शाह यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Sanjay Raut : अमित शाह यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत.
Published on

अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. अमित शाह यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

याच पार्श्वभूमीवर आता संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना अमित शाहांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले की, मणिपूरला गेले नाहीत आढावा घ्यायला, काश्मीरच्या सीमेवर गेले नाहीत आढावा घ्यायला.

लडाखमध्ये सैन्य घुसलं आहे चीनचं त्याचा आढावा नाही. पण महाराष्ट्रामध्ये ते उत्तर महाराष्ट्रातल्या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घ्यायला देशाचे गृहमंत्री संरक्षण गृहखात्याचं विशेष विमान घेऊन येत आहेत. ही जरा गोष्ट मला गमतीची आहे.

यासोबतच संजय राऊत पुढे म्हणाले की, जेव्हा गृहमंत्री येतात तेव्हा निवडणूक प्रक्रियेतील प्रमुख अधिकाऱ्यांवर दबावाचे काम करण्यासाठी ते येतात. हा गेल्या 10 वर्षातला देशाचा अनुभव आहे. लोकसभेतसुद्धा त्यांनी काही मतदारसंघात अशाप्रकारचं राष्ट्रीय कार्य केलेलं आहे. म्हणून ते सत्तेवर आलं. असं संजय राऊत म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com