Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना लिहिलेलं पत्र मागे घ्यावे आणि जाहीर करावे नवाब मलिकांवरील सर्व आरोप खोटे आहेत

Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना लिहिलेलं पत्र मागे घ्यावे आणि जाहीर करावे नवाब मलिकांवरील सर्व आरोप खोटे आहेत

संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला.
Published on

संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी संजय राऊत म्हणाले की, नवाब मलिक यांच्यावर सुडाने कारवाई केली. जसं आमच्यावर केली. नवाब मलिक हे फक्त देवेंद्र फडणवीस आणि काही लोकांवर सातत्याने पुराव्यासह बोलत होते. त्यांनी असं काही खळबळजनक पुरावे समोर आणलं त्याच्यामुळे नवाब मलिक यांच्याविरुद्ध देवेंद्र फडणवीस यांनी ईडीची कारवाई, सीबीआयची कारवाई करायला भाग पाडलं.

आज नवाब मलिक सरकारमध्ये आहेत. प्रश्न माझा इतकाच आहे देवेंद्र फडणवीसांना जेव्हा नवाब मलिक हे विधानसभेत सरकारी बाकावर बसले होते. तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना पत्र लिहिलं होते. देवेंद्र फडणवीस यांनी ते पत्र मागे घ्यावे किंवा त्यांनी जाहीर करावे नवाब मलिक यांच्यावरील सर्व आरोप, सर्व खटले खोटे आहेत आणि आम्ही सूडबुद्धीने ते खटले त्यांच्यावर दाखल केलं होते.

देवेंद्र फडणवीस हे खोटे बोलतात. ते पत्र मी जपून ठेवलं आहे. ऐतिहासिक डॉक्युमेंट आहे ते. तुम्ही मान्य करा की, नवाब मलिक यांना मी खोट्या प्रकरणात अडकवण्यासाठी ईडीवर , सीबीआयवर दबाव आणला होता. त्यांच्यावरचं खटले खोटे आहेत. त्यांना गुंतवण्यात आलं. त्यांनी आपलं पत्र मागे घ्यावे. भूमिका ठाम हा खोटारडेपणा करु नये. असे संजय राऊत म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com