राजकारण
Sanjay Raut : इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडी फुटली असं म्हणालो नाही
संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला.
संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी संजय राऊत म्हणाले की, इंडिया आघाडी फुटली आहे, महाविकास आघाडी फुटली आहे मी असं कधीही म्हटले नाही. शिवसेनेच्या कोणत्या नेत्याने असं म्हटले नाही. स्थानिक स्वराज्य संस्थेसंदर्भात जर आम्ही भूमिका मांडत असू आणि भूमिका यासाठी मांडत आहोत की, माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे गेल्या महिनाभर राज्यभरातल्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना भेटत आहेत. त्यांची भावना आहे की, स्थानिक स्वराज्य संस्था आपण स्वबळावर लढायला हवा ही त्यांची भावना आहे.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, महाविकास आघाडी विधानसभेसाठी होती, इंडिया आघाडी लोकसभेसाठी होती. स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी ही आघाडी स्थापन झाली नव्हती. आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर असतानासुद्धा स्थानिक स्वराज्य संस्था स्वतंत्रपणे लढलो होतो. असं संजय राऊत म्हणाले.