Sanjay Raut : ही आघाडी टिकली पाहिजे, मोठा पक्ष म्हणून ही जबाबदारी काँग्रेस पक्षानेच घेतली पाहिजे
संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. संजय राऊत म्हणाले की, या देशाच्या राजकारणामध्ये अधिक पुढे जावे ही आमच्या सगळ्यांची भावना आहे. पण गेल्या काही दिवसांपासून आमचे काही घटक पक्ष हे या भूमिकेत आहेत की संवाद तुटलेला आहे. डायलॉग जर तुटला तर कोणतीही आघाडी यशस्वी होत नाही. शिवसेना भाजप युतीमध्ये डायलॉग संपल्यामुळे युती तुटली. 2019 साली योग्य प्रकारे कम्युनिकेशन आणि डायलॉग झाला नाही त्याचा परिणाम युती तुटण्यात झाला.
इंडिया आघाडीमध्ये 30 पक्ष आहेत साधारण, 30 पक्षासी संवाद ठेवण्यासाठी काही जबाबदार नेत्यांची नियुक्ती झाली पाहिजे. हे माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी अनेकदा सांगितले आहे इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये. इतरसुद्धा प्रमुख नेत्यांनी हा विषय मांडला होता. देशाच्या राजकारणामध्ये इंडिया आघाडीने लोकसभा निवडणुकीमध्ये चमकदार कामगिरी केली. म्हणून ही आघाडी टिकली पाहिजे. मोठा पक्ष म्हणून आमच्या आघाडीतला ही जबाबदारी सगळ्यात जास्त काँग्रेस नेतृत्वाची आहे. ही जबाबदारी काँग्रेस पक्षानेच घेतली पाहिजे.
यासोबतच ते म्हणाले की, एकमेकांविरुद्ध निवडणुका लढणं काही चुकीचं नाही. दिल्लीसारख्या विधानसभेमध्ये जर आप आहे, काँग्रेस आहे. आपण लढू शकतो. जसं आम्ही म्हटले महानगरपालिकेमध्ये आम्हाला वेगळा विचार करावा लागेल. पण हा वेगळा विचार करताना आपण आपल्या एकेकाळच्या सहकाऱ्यांना किंवा भविष्यात आपण पुन्हा एकत्र येणार आहोत लोकसभेला असं चित्र असेल तर अगदी देशद्रोही ठरवण्यापर्यंत कुणीही आपल्या सहकाऱ्यांच्याबाबतीत जाऊ नये. ही शिवसेनेची माननीय उद्धव ठाकरे साहेबांची भूमिका आहे. असे संजय राऊत म्हणाले.