Sanjay Raut Book Narkatla Swarg : "अजून काही लिहिलं असते तर फार..."

Sanjay Raut Book Narkatla Swarg : "अजून काही लिहिलं असते तर फार..."

( Sanjay Raut Book Narkatla Swarg ) संजय राऊत यांनी त्यांच्या 'नरकातला स्वर्ग' या पुस्तकातून खळबळजनक दावे केले आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

( Sanjay Raut Book Narkatla Swarg ) संजय राऊत यांनी त्यांच्या 'नरकातला स्वर्ग' या पुस्तकातून खळबळजनक दावे केले आहेत. आर्थर रोड कारागृहात असताना संजय राऊत यांनी हे पुस्तक लिहिलेलं असून खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या 'नरकातला स्वर्ग' (Narkatla Swarg) या पुस्तकाचं उद्या प्रकाशन होणार आहे.

याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले की, "नरकातला' स्वर्ग हे जे पुस्तक उद्या प्रसिद्ध होते आहे. हे पुस्तक ज्या पद्धतीने मला तुरुंगात पाठवले. 100 दिवसापेक्षा जास्त काळ मी तुरुंगात राहिलो. ते तुरुंगातील अनुभव आहेत आणि त्यानिमित्ताने भूतकाळात ज्या घटना घडल्या त्या या तुरुंगातील प्रवासाशी संबंधित आहेत."

"ज्यांनी आम्हाला राजकीय सूडापोटी तुरुंगात पाठवले. त्यांना माननीय शरद पवार साहेब असतील, माननीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे असतील यांनी त्यांच्या अडचणीच्या काळात कशी मदत केली हे तेव्हा तुरुंगात मला त्या गोष्टी आठवल्या. यातल्या अनेक गोष्टींचा मी साक्षीदार आहे. मी अनेक गोष्टी माझ्या डोळ्यांनी पाहिल्या. काही गोष्टी या गोपनीय असायला पाहिजे. मी फक्त एक संदर्भ दिला. 30-35 वर्षात काय घडलं होतं? याविषयी अनेक घटना माझ्याकडे आहेत. मी एकच संदर्भ दिला की, शरद पवार साहेब असतील किंवा माननीय बाळासाहेब असतील."

" या महाराष्ट्रातील दोन प्रमुख नेत्यांनी त्यांचा जो स्वभाव आहे मदत करण्याचा राजकारण न पाहता त्यानुसार केलेल्या मदतीला न जागता या दोन्ही प्रमुख नेत्यांचे पक्ष कसे फोडले आणि पक्ष संपवण्यासाठी कसा अट्टाहास केला. हा एक वेगळ्या प्रकारचा स्वभाव आम्हाला राजकारणात दिसला म्हणजे उपकाराची फेड अपकाराने कशी केली. भाजपला काय माहित आहे? ते कुठे होते तेव्हा. आज जाऊन पवार साहेबांना भेटा आणि त्यांच्याशी बोला. मी लिहिलेल्या दोन्ही घटना या 100 टक्के सत्य आहेत."

यासोबतच ते पुढे म्हणाले की, "यापेक्षाही जास्त मी लिहू शकलो असतो. फार हाहाकार माजला असता. अजून काही लिहिलं असते तर. पण मी मर्यादा पुरुषोत्तम रामाचा भक्त असल्यामुळे मी मर्यांदा पाळेन आणि संयम पाळेन. मी प्रदिर्घ काळ बाळासाहेबांबरोबर राहिलेला माणूस आहे. त्यामुळे अनेक गोष्टी त्यांनी केलेली मदत किंवा इतर काही राजकीय घडामोडीचा मी एकमेव साक्षीदार आहे असे मला वाटतं. पण मी त्या कधीच लिहिणार नाही आणि बोलणार नाही. असे संजय राऊत म्हणाले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com