विरोधी पक्षावर दबावाचे राजकारण; मुश्रीफांवरील कारवाईवर राऊतांची प्रतिक्रिया

विरोधी पक्षावर दबावाचे राजकारण; मुश्रीफांवरील कारवाईवर राऊतांची प्रतिक्रिया

माजी मंत्री व राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीने छापे टाकले आहेत. सकाळीपासून मुश्रीफांच्या घरी ईडीची छापेमारी सुरु आहे.
Published on

मुंबई : माजी मंत्री व राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीने छापे टाकले आहेत. सकाळीपासून मुश्रीफांच्या घरी ईडीची छापेमारी सुरु आहे. साखर कारखान्याच्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीने ही छापेमारी केली आहे. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हसन मुश्रीफांना जेलमध्ये टाकण्याची भाषा काही लोकांची होती. सरकारमध्ये सामील झालेल्या लोकांवरील या कारवाया रद्द होतात. आणि विरोधी पक्षांच्या लोकांवर दबावाचे राजकारण केले जाते, असा थेट आरोप त्यांनी केला आहे.

विरोधी पक्षावर दबावाचे राजकारण; मुश्रीफांवरील कारवाईवर राऊतांची प्रतिक्रिया
हसन मुश्रीफ यांच्यासह चंद्रकांत गायकवाड यांच्या घरावर ईडीची छापेमारी

हसन मुश्रीफ विरोधी पक्षांमध्ये आहेत जे लढत आहेत. जे या विचारधाराविरुद्ध आहेत. त्यांच्या बाबतीत गेल्या काही वर्षापासून केंद्रीय तपास यंत्रणांकडून धाडी करत आहेत. आपण पाहिले याआधी अनेक लोकांना अटक देखील झाली. त्यात मी होतं नवाब मलिक व अनिल देशमुख हेही होते. हसन मुश्रीफांना जेलमध्ये टाकण्याची भाषा काही लोकांची होती. सरकारमध्ये सामील झालेल्या लोकांवरील या कारवाया रद्द होतात. त्या लोकांना दिलासा मिळतो आणि विरोधी पक्षांमध्ये आहेत प्रमुख लोकांमध्ये अशा लोकांवर दबावाच राजकारण केले जातात. हसन मुश्रीफ संघर्ष करणारे नेते आहेत लढवय्या आहेत ते संकटाशी सामना करणारे आहेत, असे म्हणत संजय राऊतांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे.

विरोधी पक्षावर दबावाचे राजकारण; मुश्रीफांवरील कारवाईवर राऊतांची प्रतिक्रिया
Vidhan parishad : शिंदे गट आणि भाजपमध्ये धुसफुस? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...

सर्वोच्च न्यायालय व निवडणूक आयोगाच्या सुनावणीवरही संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. काल सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी झाली. मी स्वतः पाहिलेला आहे दोन्ही बाजूंनी युक्तिवाद या ठिकाणी झाला.यानंतर 14 फेब्रुवारी ही तारीख दोघांसमोर ठेवले. त्यानंतर निवडणूक आयोगामध्ये दोन तास सुनावणी झाली तिथे आम्ही उपस्थित होतो त्या संदर्भातला निकाल लागू शकेल. त्या ठिकाणी आम्ही मागणी केलेली आहे जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येत नाही तोपर्यंत कोणताही निर्णय घेऊ नये. या ठिकाणी स्वतंत्र म्हणवून घेणाऱ्या स्वायत्त संस्था यांच्यावरती राजकीय दबाव आहे तो ताण तणाव त्यांच्यावरती दिसून येत आहे. पक्षपात काय असतो तो आम्हाला त्या घटनेच्या प्रमुख खुर्चीवर बसणाऱ्यांच्या चेहऱ्यावरती दिसून येतो, असेही त्यांनी म्हंटले आहे.

मोहन भागवत यांच्या वाक्याचे स्वागत करतो. आम्ही पण तेच बोलतो 20 कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या हे मुसलमानांची आहे. राजकारण करण्यासाठी व इलेक्शन जिंकण्यासाठी तुम्ही सारखे हिंदू मुसलमान करणार असाल तर या ठिकाणी देश हा तुटून जाईल. लोकांच्या मनात भीती व्यक्त करून आपण जास्त वेळ राजकारण करू शकत नाही. आमच्या मार्गदर्शक नेता मोहन भागवत यांनी ही गोष्ट पुढे ठेवली आहे. तर भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी देखील यावरती लक्ष घेतलं पाहिजे, असा सल्ला संजय राऊतांनी भाजपला दिला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com