Sanjay Raut: शिवभोजन थाळी बंद करण्याच्या निर्णयावर संजय राऊतांची सरकारवर टीका

शिवभोजन थाळी बंद करण्याच्या निर्णयावर संजय राऊतांनी सरकारवर टीका केली आहे. राज्याच्या तिजोरीत खडखडाट झाल्याने अनेक लोकप्रिय योजना बंद करण्याच्या विचारात सरकार आहे.
Published by :
Prachi Nate

राज्याच्या तिजोरीमध्ये खडखडाट झाल्याने अनेक लोकप्रिय योजनांना ब्रेक लागण्याची शक्यता आहे. शिवभोजन थाळीसह इतर योजना बंद करण्याबाबत सरकारचा विचार सुरू आहे. वित्तीय तूट भरून काढण्यासाठी राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.. जवळपास एक लाख कोटी रुपयांची तूट भरुन काढण्यासाठी अनेक योजना बंद कराव्या लागणार आहेत. आगामी अर्थसंकल्पासाठी घेण्यात येणाऱ्या विभागानिहाय बैठकामध्ये या योजना बंद करायच्या का याची ही चाचपणी सुरु आहे.

शिवभोजन थाळी बंद करू नये असं माजी मंत्री छगन भुजबळ यांचकडून मुख्यमंत्र्यांना पत्र देण्यात आले. शिव भोजन थाळी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोविड काळात सुरू केली होती. मात्र, लाडकी बहीण योजनेमुळे मोठ्या प्रमाणावर सरकारच्या तिजोरीवर भार वाढल्याने या योजना बंद करायच्या का याची चाचपणी राज्य सरकारकडून सुरु आहे. अर्थसंकल्पाच्या आधी यावरती निर्णय घेण्यासाठी सरकारच्याही हालचाली सुरु आहेत.

याचपार्श्वभूमिवर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया आहे म्हणाले की, शिवभोजन थाळी ही आधीच्या सरकारनं गोर-गरीब जनतेसाठी सुरु केली होती.. पण आताच्या सरकारला गोरगरिबांना अन्न देणं परवडत नाही, कारण त्यांना राजकारणात याचा उपयोग नाही आहे... पण छगन भुजबळ यांनी हा विषय मांडला आहे आणि आम्ही त्यांच्या मागे उभे राहू, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com