Sanjay Raut
Sanjay RautTeam Lokshahi

भूंखड घोटाळ्याचे कागदपत्रे योग्य ठिकाणी गेली, राऊतांचे खळबळजनक विधान

राज्यात एवढा मोठा भूखंड घोटाळा झाला तरीही अण्णा हजारे या विषयावर गप्प का आहेत?
Published by :
Sagar Pradhan
Published on

राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हिवाळी अधिवेशनादरम्यान भूखंड घोटाळ्याचे गंभीर आरोप होत आहे. या आरोपांमुळे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चांगलीच जुंपलेली दिसत आहे. परंतु, आता शिवसेन ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी याबाबत खळबळजनक विधान केले आहे.

Sanjay Raut
शिंदे-फडणवीस सरकार अनैतिक, सुब्रह्मण्यम स्वामींचा भाजपला घरचा आहेर

नेमकं काय म्हणाले संजय राऊत?

आम्ही केंद्रातील प्रमुख लोकांना कागदपत्रे पाठवली आहेत. योग्य ठिकाणी कागदपत्रे गेली आहेत, दरम्यान शिंदे यांच्या घोटाळ्यावर देवेंद्र फडणवीस सारवासारव करत असल्याचा आरोपही त्यांनी केले आहे. नागपुरातील भूखंड घोटाळ्यावरुन महाराष्ट्रातील विरोधी पक्षाने हिवाळी अधिवेशन दणाणून सोडलं. विरोधकांनी या प्रकरणी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरच आरोप करुन त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यावेळी संजय राऊत यांनी भाजपवर आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यावरही निशाणा साधला.

राज्यात एवढा मोठा भूखंड घोटाळा झाला तरीही अण्णा हजारे या विषयावर गप्प का आहेत? असा प्रश्न मी नाही तर समाजमाध्यमातून विचारला जात आहे. सरकारने बोहणीचा भ्रष्टाचार केला. 110 कोटींचं नुकसान झालं, 16 भूखंड बिल्डरांच्या घशात गेले तरी त्यावर कोणी काहीच बोलत नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सारवासारव करतात. ही मोदींच्या विचारधारेची फसवणूक आहे, असं राऊत यावेळी म्हणाले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com