Sanjay Raut
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Sanjay Raut) संजय राऊत आता पुन्हा मैदानात उतरणार आहेत. खासदार संजय राऊत प्रकृतीच्या कारणास्तव गर्दीपासून दूर होते. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर संजय राऊत यांनी सार्वजनिक जीवनातून काही महिने दूर राहणार असल्याचे जाहीर केले होते.
त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली होती. त्यानंतर आजपासून संजय राऊत पुन्हा एकदा मैदानात उतरल्याचे पाहायला मिळणार आहे. संजय राऊत महिन्याभराने बोलायला उभे राहणार असून सकाळी 10 वाजता ते माध्यमांशी संवाद साधणार आहेत.
ठाकरेंच्या शिवसेनेची तोफ पुन्हा धडाडणार असून संजय राऊत आज काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
Summery
संजय राऊत पुन्हा एकदा मैदानात उतरणार
संजय राऊत महिन्याभराने बोलायला उभे राहणार
सकाळी 10 वाजता साधणार माध्यमांशी संवाद
