Shahajibapu Patil : "एक दिवस असा येईल आदित्य ठाकरेच उद्धव साहेबांना सोडायची भाषा बोलतील"
माजी आमदार राजन साळवी यांनी उद्धव ठाकरे यांना सोडून एकनाथ शिंदेंच्या पक्षात प्रवेश केला त्यानंतर अनेक प्रतिक्रिया देखील येत आहेत. यावरुनच आता माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर निशाणा साधला आहे.
शहाजीबापू पाटील म्हणाले की, चौकशा झाल्या म्हणून कोणी पक्ष सोडत नाही. परंतु कालच्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची परिस्थिती अशी झालेली आहे की, तिथे थांबण्यात काही अर्थ नाही अशी भावना इथपर्यत झाली की, एक दिवस असा उगवेल उद्धव साहेबांना आदित्य साहेबच सोडायची भाषा बोलतील.
यासोबतच शहाजीबापू यांना आदित्य ठाकरे यांचे विरोधी पक्षनेता म्हणून नाव पुढे येत असल्याबाबत प्रश्न विचारला असता, त्यावर उत्तर देत शहाजीबापू पाटील म्हणाले की, असे काही घडणार नाही. त्यांच्याकडे तेवढे संख्याबळ नाही. पण त्यांना हे पद दिले तर महाराष्ट्रात अतिशय निकृष्ट काम करणारा विरोधी पक्षनेता म्हणून आदित्य ठाकरेंचं नाव गाजेल. असे ते म्हणाले.