Sharad Pawar - Ajit Pawar : शरद पवार आणि अजित पवार आज पुन्हा एकाच मंचावर; कारण काय?
(Sharad Pawar - Ajit Pawar ) गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे. अशी चर्चा महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात सुरू असतानाच आज पुन्हा एकदा शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर एकत्र येणार आहेत. पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये ऊस उत्पादन वाढीसाठी एआय तंत्रज्ञानाच्या वापरावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले.
या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी शरद पवार असतील, तर अजित पवार, माणिकराव कोकाटे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. ऊस उत्पादनात आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग, हवामान आधारित निर्णय, सिंचन नियोजन आणि रोग व्यवस्थापन यांसारख्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.
त्यामुळे आज पुन्हा एकदा एकत्र एकाच मंचावर शरद पवार आणि अजित पवार येणार असल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.