शरद पवारांच्या अमित शाहांवरील टीकेला विनोद तावडेंचं प्रत्त्युत्तर; म्हणाले...

शरद पवार यांनी अमित शाहांवर केलेल्या टीकेला विनोद तावडे यांनी प्रत्त्युत्तर दिलं आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

शरद पवार यांनी अमित शाहांवर केलेल्या टीकेला विनोद तावडे यांनी प्रत्त्युत्तर दिलं आहे. विनोद तावडे ट्विट करत म्हणाले की, दाऊदच्या हस्तकांना आपल्या हेलिकॉप्टर मधून प्रवास करविणाऱ्या मुख्यमंत्र्यांपेक्षा सोहराबुद्दीन सारखा लष्कर-ए-तोयबाचा हस्तक व इस्लामी दहशतवादी याच्या एन्काऊंटर मध्ये तडीपार होणे हे देशभक्तीचे लक्षण मानले जाईल.

अमित शहांची तडीपारी दरोडा-चोरीसाठी नव्हती! दाऊद हस्तकांना संरक्षण हे छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू-फुले-आंबेडकर यांच्या महाराष्ट्राला शोभणारं नाही, हे बहुदा मा. पवार साहेब विसरले आहेत. असे विनोद तावडे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com