शरद पवारांनी सांगितले अशोक चव्हाण भाजपामध्ये जाण्याचे कारण...

अशोक चव्हाण यांनी भाजपामध्ये प्रवेश केला.
Published by :
Siddhi Naringrekar

अशोक चव्हाण यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. त्यांच्या या भाजपा प्रवेशावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया आल्या. याच पार्श्वभूमीवर आता शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली.

या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना शरद पवार म्हणाले की, भाजपच्या व्हाईट पेपरमध्येच आदर्श घोटाळ्याचा उल्लेख होता. अशोक चव्हाणांचा उल्लेख म्हणजे इशाऱ्याची शक्यता होती. अशोक चव्हाणांच्या निर्णयाबद्दल आश्चर्य वाटत नाही. भाजपने गेल्या १० वर्षातील त्यांची कामगिरी आणि विरोधकांबद्दलची श्वेतपत्रिका काढली होती. त्यामध्ये अशोक चव्हाण यांच्याशी संबंधित आदर्श घोटाळ्याचा उल्लेख होता. असे शरद पवार म्हणाले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com