sanjay raut Eknath shinde
sanjay raut Eknath shindeTeam Lokshahi

हातातले खंजीर आधी बाजूला ठेवा अन् मग बाळासाहेबांना अभिवादन करा; राऊतांचा टोला

शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृती दिनानिमित्त शिंदे गट आज शिवाजी पार्कवर अभिवादन करणार आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे.
Published on

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृती दिन 17 नोव्हेंबर रोजी आहे. परंतु, ठाकरे गटाशी संघर्ष टाळण्यासाठी शिंदे गट आजच बाळासाहेबांना ठाकरेंना शिवाजी पार्कवर अभिवादन करणार आहे. यावेळी कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजनही केलं आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे.

sanjay raut Eknath shinde
श्रध्दा वालकर प्रकरणातील आरोपीला भरचौकात फासावर लटकवले पाहिजे : संजय राऊत

शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृती दिन 17 नोव्हेंबरला आहे. त्यापूर्वीच म्हणजे 16 नोव्हेंबर रोजी शिंदे गटाने मुंबईत कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन केलं आहे. दादरच्या वीर सावरकर स्मारकात हा मेळावा होणार आहे. या मेळाव्याची शिंदे गटाने जय्यत तयारी सुरू केली आहे. शिंदे गटाच्या या मेळाव्यात सर्व नगरसेवक, आमदार, खासदार, मंत्री, जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्याला प्रचंड गर्दी करण्याची तयारी शिंदे गटाने सुरू केली आहे. दुसऱ्या दिवशी बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतीदिन आहे. त्यामुळे शिवतीर्थावर मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गट आपली ताकद दाखवून देण्याच्या तयारीत असल्याचं सांगितलं जात आहे. अशातच संजय राऊतांनी शिंदे गटावर टीकास्त्र सोडले आहे.

संजय राऊत म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे हे देशाचे आणि विश्वाचे आहे. फक्त आपल्या हातातले खंजीर बाजूला ठेवा आणि मग स्मारकात हात जोडायला जा, असा टोला त्यांनी शिंदे गटाला लगावला आहे. तसेच, ज्यांनी शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसले त्यांचे कधी भले झाले नाही हा इतिहास आहे, अशी टीकाही राऊतांनी केली आहे.

sanjay raut Eknath shinde
दोन बारक्या पोरांवर मी बोलणार नाही; सुषमा अंधारेंची राणेंवर खोचक टीका

दरम्यान, मुंबई महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्याने शिंदे गटाने आता मुंबईवर लक्ष केंद्रीत केलं आहे. त्याचाच एक भाग म्हणून शिंदे गट मुंबईत जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनाच्या एक दिवस आधीच शिंदे गटाने दादरमध्ये मेळाव्याचं आयोजन केलं आहे. या मेळाव्यातून शिंदे गट आपली ताकद दाखवणार असून मुंबई महापालिकेचं रणशिंग फुंकणार आहे. त्यामुळे या मेळाव्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com