Shrikant Shinde
Shrikant Shinde Team Lokshahi

ठाकरेंच्या 'त्या' आव्हानाला श्रीकांत शिंदेंचे जोरदार प्रत्युत्तर; आम्ही पण तयार आहोत...

निवडणुका लागणारच आहेत. निवडणुका घेवून दाखवा म्हणजे काय? देशात, महाराष्ट्रात निवडणूक आयोग आहे की नाही?
Published by :
Sagar Pradhan
Published on

राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. त्यातच दुसरीकडे शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातील वाद तीव्र झाला आहे. अशातच हिंमत असेल तर पालिका, विधानसभा किंवा लोकसभा कुठल्याही निवडणुका लावून दाखवा, असे आवाहन शिवसेना ठाकरे गट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे सरकारला केले होते. त्याच आव्हानावर आता शिंदे गटाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

Shrikant Shinde
'उध्दव ठाकरेंचा स्वार्थ, पुत्र प्रेम जबाबदार...' का म्हणाले बावनकुळे असे?

काय म्हणाले श्रीकांत शिंदे?

कल्याण लोकसभा मतदार संघातील डोंबिवली मधील आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस कोर्ट व वातानुकूलित अभ्यासिकेचे लोकार्पण रविवारी खासदार शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, निवडणुका लागणारच आहेत. निवडणुका घेवून दाखवा म्हणजे काय? देशात, महाराष्ट्रात निवडणूक आयोग आहे की नाही? त्यांनी अभ्यास केला असेल तर कोर्टात ओबीसी आरक्षण, प्रभाग रचना हे विषय प्रलंबित आहे. त्याची सुनावणी सुरू आहे. असे सगळे असताना इलेक्शन घ्या, इलेक्शन घ्या असे बोलल जातेय. आम्ही पण तयार आहोत इलेक्शनला. इलेक्शन येऊन द्या तरी. असे उत्तर त्यांनी दिले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com