Shivsainik Aggressive in Osmanabad
Shivsainik Aggressive in OsmanabadTeam Lokshahi

मंत्री तानाजी सावंत हे आलेल्या रस्त्यावर शिवसैनिकांनी गौमुत्र शिंपडलं

हिंदू गर्व गर्जना यात्रेसाठी आरोग्यमंत्री सावंत ज्या रस्त्यावरून आले होते तो रस्ता पवित्र करण्यासाठी शिवसैनिकांनी शिंपडलं गौमुत्र.
Published by :
Vikrant Shinde
Published on

बालाजी सुरवसे | उस्मानाबाद:

काल शिंदेगटाचे आमदार व राज्याते आरोग्यमंत्री तानाजी सावंत हे हिंदू गर्व गर्जना मेळाव्यासाठी उस्मानाबादमध्ये होते. यावेळी बोलताना त्यांनी पातळी सोडून बेताल वक्तव्य केली. 'मुख्यमंत्र्यांवर टीका कराल तर, नागडं केल्याशिवाय राहणार नाही' असं ते म्हणाले. तर, 'खासदार राजेनिंबाळकरांनी झक मारली' असं वक्तव्यही त्यांनी केलं. त्यांच्या या बेताल वक्तव्यांमुळे शिवसैनिक प्रचंड आक्रमक झाले.

Shivsainik Aggressive in Osmanabad
साताऱ्यात लम्पीचा उद्रेक; शर्यतीला सशर्त परवानगी देण्याची बैलगाडा मालकांची मागणी

सावंत यांच्या विरोधात शिवसेनेची जोरदार घोषणाबाजी:

आरोग्यमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत हे उस्मानाबाद येथे हिंदू गर्व गर्जना मेळाव्यासाठी आले असता ज्या ठिकाणी मेळावा आयोजित करण्यात आला होता त्या परीसरातील रस्त्यावर शिवसेनेच्या वतीनं गौमुञ शिंपडत हा रस्ता पवित्र करण्यात आला तसेच यावेळी सावंत यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शनं करण्यात आली. दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी तात्काळ शिवसेनेच्या ४० ते५० शिवसैनिकांना ताब्यात घेतलं.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com