शिंदे- ठाकरे गटातील वाद उफाळणार, मुंबई महापालिकेतील शिवसेना कार्यालयावर शिंदे गटाचा ताबा
राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. त्यातच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपलेली असताना, शिवसेनेत झालेल्या बंडखोरीपासून शिंदे गट आणि ठाकरे गट असे दोन पडले. या गटातील वाद दिवसांदिवस वाढतच चालला आहे. खरी शिवसेना नक्की कोणाची हा वाद सुरु असताना आता राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. शिंदे गटाकडून मुंबई महानपालिकेतील शिवसेना कार्यालयावर कब्जा केला आहे. त्यामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
बाळासाहेबाच्या शिवसेनेचे सर्व पदाधिकारी मुंबई महानगरपालिकेत पोहोचले आहेत. शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना कार्यालयाचा ताबा घेतला. विधानसभेतील कार्यालयावरून राडा झाला होता. आता शिंदेंच्या नेत्यांचा पालिकेतील कार्यालयावर डोळा आहे. कार्यालयाच्या ताब्यावरून दोन गटांमध्ये राडा होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात शिंदे गटाच्या नेत्यांनी पालिका आयुक्त इक्बाल चहल यांची भेट घेतली. यावेळेस स्वत: खासदार राहुल शेवाळे, शितल म्हात्रे, ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के, यशवंत जाधव, अशोक जाधव आणि इतर नेते उपस्थित होते.