शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात मोठी इनकमिंग होणार

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात मोठी इनकमिंग होणार

निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे.
Published on

निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. राजकीय पक्ष अनेक बैठका, पत्रकार परिषद घेत आहेत. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या.

याच पार्श्वभूमीवर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात मोठी इनकमिंग होणार असून ऐन निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंचा महायुतीला मोठा धक्का बसणार आहे. सांगोल्यातून राष्ट्रवादीचे दीपक आबा साळुंखे यांचा संध्याकाळी 4 वाजता मातोश्रीवर ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत.

यासोबतच भाजपच्या राजन तेली यांचा 5 वाजता प्रवेश होणार असून चिंचवड येथील राष्ट्रवादीचे मोरेश्वर बोन्डवे यांचा 6 वाजता पक्षप्रवेश होणार आहे. त्यामुळे आता या पक्षप्रवेशाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राजन तेली यांच्या पक्ष प्रवेशामुळे सावंतवाडीतून दीपक केसरकर यांच्या विरोधात राजन तेली यांना संधी देण्यात येण्याची शक्यता असून यासोबतच दीपक आबा साळुंखे यांच्या पक्ष प्रवेशामुळे सांगोल्यातून शहाजीबापू पाटील यांच्याविरोध दीपक आबा साळुंखे मैदानात उतरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com