Eknath Shinde
Eknath Shinde

Eknath Shinde : ShivSena : मुंबईत आजपासून शिवसेनेचे ऑपरेशन टायगर होणार सक्रिय

कुर्ला विधानसभेत मनसेच्या शेकडो कार्यकर्त्यांचा होणार शिवसेनेत अधिकृत प्रवेश
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात

  • मुंबईत आजपासून शिवसेनेचं ऑपरेशन टायगर होणार सक्रिय

  • सर्व विभाग प्रमुखांना एकनाथ शिंदे कडून ग्रीन सिग्नल

  • कुर्ला विधानसभेत मनसेच्या शेकडो कार्यकर्त्यांचा होणार शिवसेनेत अधिकृत प्रवेश

(Eknath Shinde) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. यातच आता मुंबईत आजपासून शिवसेनेचे ऑपरेशन टायगर सक्रिय होणार असल्याची माहिती मिळत आहे.

सर्व विभाग प्रमुखांना एकनाश शिंदे यांच्याकडून ग्रीन सिग्नल मिळाल्याची माहिती मिळत असून मनसे आणि शिवसेनेच्या युतीच्या पार्श्वभूमीवर आता शिंदेंच्या शिवसेनेकडून या दोन्ही पक्षातील महत्वाच्या पदाधिकाऱ्यांना आपल्याकडे खेचण्यास सुरुवात झाल्याची माहिती समोर येत आहे.

कुर्ला विधानसभेत मनसेचे शेकडो कार्यकर्ते आज आमदार मंगेश कुडाळकर आणि विभाग प्रमुख नंदू राणे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत पक्ष प्रवेश करणार असून बाळासाहेब ठाकरे भवन कुर्ला इथे मनसेच्या शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश होणार आहे. त्यामुळे आता शिवसेनेच्या या ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा रंगल्याचे पाहायला मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com