Shivendra Raje Bhosale : वाघनखे खोटी आहेत हे आदित्य ठाकरेंनी सिद्ध करावे

Shivendra Raje Bhosale : वाघनखे खोटी आहेत हे आदित्य ठाकरेंनी सिद्ध करावे

साताऱ्यात पोवई नाका या ठिकाणी गांधी जयंतीचं औचित्य साधून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

प्रशांत जगताप, सातारा

साताऱ्यात पोवई नाका या ठिकाणी गांधी जयंतीच औचित्य साधून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली आहे. स्वच्छता आठवड्याचा नियोजन करण्यात आला असून आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी या मोहिमेत सहभाग घेतला आहे.

यावेळी आदित्य ठाकरेंनी वाघनखांबाबत उपस्थित केलेला प्रश्न हा राजकीय विषय आहे. त्यांच्याकडून मुद्दाम प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. जर इंग्लंडहून आणण्यात येणारी वाघनखे ही खरी नाहीत तर आदित्य ठाकरे यांनी ही वाघनखे खोटी आहेत हे सिद्ध करावे असे आवाहन आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी आदित्य ठाकरे यांना केलं आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com