Shivsena - NCP : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी शिवसेना आणि दादांच्या राष्ट्रवादीत टेन्शन वाढलं ?
थोडक्यात
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी शिवसेना आणि राष्ट्रवादी अजीत पवार यांचे टेंन्शन वाढले?
भाजपच्या ऑपरेशन लोटसवर दोन्ही नेत्यांची नाराजी?
भाजपचा अजितदादांसह शिंदेंनाही ‘दे धक्का’
(Shivsena - NCP) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागल्याची माहिती मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार यांचं टेंशन वाढल्याचे पाहायला मिळत असून पक्षांतर्गत भाजपच्या ऑपरेशन लोटसवर दोन्ही नेत्यांची नाराजी असल्याची माहिती मिळत आहे.
भाजपमध्ये मेगाप्रवेशामुळे पक्षांतर्गत बैठकांचे सत्र सुरु असल्याचे पाहायला मिळत असून भाजपच्या या मोठ्या मेगा प्रवेशांमुळे सोलापूर आणि पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या घडामोडींमुळे शिंदे आणि अजित पवार यांच्या पक्षात खळबळ माजली असल्याचे बोलले जात आहे.
