Ravindra Dhangekar
Ravindra Dhangekar

Ravindra Dhangekar : एकनाथ शिंदे यांनी रवींद्र धंगेकर यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी; पुणे महानगर प्रमुखपदी निवड

रवींद्र धंगेकर यांची पुणे महानगर प्रमुखपदी निवड
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

(Ravindra Dhangekar) रवींद्र धंगेकर यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांच्या या पक्षप्रवेशानंतरच त्यांना महत्त्वाची जबाबदारी देण्यात येईल, अशी चर्चा सुरू झाली होती.

अखेर ही चर्चा खरी ठरवत, आज धंगेकर यांची शिवसेना (शिंदे गट) पुणे महानगर प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना शिंदे गटात पुणे महानगर प्रमुखपद हे एक महत्त्वाचे संघटनात्मक स्थान आहे. या पदावर असलेल्या नेत्याच्या अधिपत्याखाली दोन ते तीन शहर प्रमुख असतात.

संपूर्ण पुणे शहरातील पक्ष संघटना मजबूत करण्याची, प्रचार मोहीम राबवण्याची, स्थानिक निवडणुकांची तयारी करण्याची तसेच नव्या नेतृत्वाचा विकास घडवण्याची जबाबदारी महानगर प्रमुखांकडे असते.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com