Uddhav Thackeray - Raj Thackeray : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेची आज एकत्र पत्रकार परिषद; कारण काय?

मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युतीबाबत गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

(Uddhav Thackeray - Raj Thackeray ) मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युतीबाबत गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. यावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया देखील येत आहेत.

याच पार्श्वभूमीवर आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेची एकत्र पत्रकार परिषद होणार आहे. आज 12.30 वाजता ही पत्रकार परिषद पार पडणार आहे.

इंडिगो एअरलाइन्स कर्मचाऱ्यांबाबत ही पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत दोन्ही नेते नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com