एसटी कामगार आत्महत्या करतोय, शिवसेनेचा मराठी बाणा कुठे हरवला: राधाकृष्ण विखे
कुणाल जमदाडे | अहमदनगर | एसटी कामगारांच्या बाबतीत काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते बोलायला तयार नाही. मुख्यमंत्र्याना काय बोलावे काही सुचेना रोज परिवहन मंत्री बोलतात याला कुठला आधार नाही. मराठी माणसाचे भांडवल करणारी शिवसेना, आज एसटी कामगार रस्त्यावर आहे. विखे पाटील यांनी राज्य सरकारच्या दोन वर्षाच्या कारभारावर लोणी येथे पत्रकार परिषद घेत जोरदार टीका केली. आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी पहिल्यादा या विषयामध्ये लक्ष घालून कामगारांच्या बाजूने भूमिका घेतली असती. पहिल्यानंदा अस घडत गृहमंत्री फरार आहे. पोलीस आयुक्त फरार आहे. गृहमंत्री नंतर डजन भर मंत्र्यांचे भ्रष्टाचार बाहेर येत आहे. राज्यातल्या जेष्ठ नेत्यांना अनिल देशमुखांची पाठ राखन करायला भरपूर वेळ आहे मात्र एसटी कर्मचाऱ्यांना द्यायला वेळ नाही असं म्हणत विखे पाटलांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली.
या सरकारने वसुलीचे उद्दिष्ट दिले आहे. अधिकाऱ्यांना मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांचं कोणतेही नियंत्रण या मंत्र्यांवर राहिलेलं नाही या राज्यातला प्रत्येक मंत्री मुख्यमंत्री म्हणून वावरत आहे. दोन वर्षांमध्ये कोणत्या समाजाला हे सरकार न्याय देऊ शकलं नाही. सरकारने मराठा समाजाच आरक्षण घालवलं, ओबीसी समाजाच्या आरक्षणाबाबत ही तीच हेळसांड झाली आहे. आरक्षण देण्यासाठी या सरकारची इच्छा शक्ती राहिली नाही, राज्यामध्ये अतिवृष्टी झाली पुरामुळे नुकसान झाले, अनेकजण बांधावर गेलेत मोठमोठ्या घोषणा केल्यात शेतकऱ्याच्या पदरात काहीच पडले नाही. अनेक गर्जना केल्या सत्तेमध्ये येण्यासाठी काही मंडळी तर पावसामध्ये भिजली, शरद पवारांचे नाव न घेता राधाकृष्ण विखे यांनी टोला लगावला.

