Kunal Kamra Audience: आता कुणाल कामराचे चाहतेही अडचणीत, समन्स बजावले

कुणाल कामराला आतापर्यंत चौकशीला येण्याचे तीन समन्स देण्यात आलेले आहेत.
Published by :
Shamal Sawant

मुंबई पोलिसांनी कुणाल कामरा यांच्या स्टँड-अप कॉमेडी 'नया भारत' शोला उपस्थित असलेल्या प्रेक्षकांना समन्स बजावले आहेत. या प्रकरणी भारतीय पोलिस सेवेतील माजी अधिकारी आणि आता वकील असलेले वाय.पी. सिंग यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना माहिती दिली आहे, इलेक्ट्रॉनिक पुरावे उपलब्ध असल्याने या प्रकरणात प्रेक्षकांना बोलावणे बंधनकारक नाही.

या आधी कुणाल कामरा प्रकरणात जिथे हा संपूर्ण शो करण्यात आला त्या हेबीटेट स्टुडिओची चौकशी करण्यात आलेली आहे. कुणाल कामराला आतापर्यंत चौकशीला येण्याचे तीन समन्स देण्यात आलेले आहेत. तर “गेल्या १० वर्षांपासून मी जिथे राहत नाही अशा पत्त्यावर जाणे म्हणजे तुमचा वेळ आणि सार्वजनिक संसाधनांचा अपव्यय आहे.” अशी पोस्ट कामरा ने केले

समोर आलेल्या माहितीनुसार, चार्जशिट दाखल करण्याआधी सर्व सविस्तर प्रकरणाची बाजू तपासण्यासाठी आणि प्रत्यक्षदर्शी यांचा जबाब त्यात असण्याच्या अनुषंगाने हे समन्स देण्यात आलेल आहेत

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com