Sudhakar Badgujar
Sudhakar Badgujar

Sudhakar Badgujar : सुधाकर बडगुजर आज भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी करण्यात आली.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

(Sudhakar Badgujar) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांनी नाशिकमध्ये आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली होती. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते.

त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी करण्यात आली. पक्षविरोधी वक्तव्य केल्याप्रकरणी ही कारवाई त्यांच्यावर करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

याच पार्श्वभूमीवर आज सुधाकर बडगुजर भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यासोबतच सुधाकर बडगुजर यांच्यासह विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढलेले गणेश गीते देखील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता आहे.

स्थानिक पदाधिकाऱ्यांचा विरोध डावलून सुधाकर बडगुजर आणि गणेश गीते यांना प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती मिळत आहे. सुधाकर बडगुजर यांच्याकडून शक्तीप्रदर्शन केलं जाण्याची शक्यता आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com