वाघाला पराभूत करण्यासाठी जंगलातले सर्व प्राणी एकत्र आलेत; मुनगंटीवारांचे विरोधकांवर टीकास्त्र

वाघाला पराभूत करण्यासाठी जंगलातले सर्व प्राणी एकत्र आलेत; मुनगंटीवारांचे विरोधकांवर टीकास्त्र

भाजप विरोधात मोट बांधण्यासाठी पाटण्यात विरोधी पक्षांची आज बैठक पार पडली आहे. यावरुन भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी विरोधी पक्षांवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.
Published on

अनिल ठाकरे | चंद्रपूर : भाजप विरोधात मोट बांधण्यासाठी पाटण्यात विरोधी पक्षांची आज बैठक पार पडली आहे. या बैठकीसाठी उद्धव ठाकरे, शरद पवार, राहुल गांधी उपस्थित आहे. यावरुन भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी विरोधी पक्षांवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. वाघाला पराभूत करण्यासाठी जंगलातले सर्व प्राणी एकत्र आलेत. वाघाने डरकाळी फोडली की पळून जातात, अशी टीका त्यांनी केली आहे.

वाघाला पराभूत करण्यासाठी जंगलातले सर्व प्राणी एकत्र आलेत; मुनगंटीवारांचे विरोधकांवर टीकास्त्र
पेट्रोल नाहीतर 'हे' इंधन मिळणार अवघ्या 15 रुपयांत, ऑगस्टमध्ये करणार लॉन्च; गडकरींची मोठी घोषणा

पाटणा येथे विरोधक एकत्र आलेत तरी मतदार पटणार नाहीत. एकत्र कशासाठी आलेत, या बैठकीमध्ये यांना देशाच्या प्रगतीची चिंता नाही. देशाचा गौरव वाढविण्याचा प्रयत्न नाही, हे सर्व अयशस्वी नेते आहेत, असा निशाणा मुनगंटीवारांनी साधला आहे.

देशाच्या प्रगतीच्या संदर्भामध्ये आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, अध्यात्मिक हे चार विकासाचे मूलभूत घटक आहे. विरोधकांचा काय मास्टर प्लॅन आहे, ब्लुप्रिंट आहे? तुमच्या की या देशाला नेतृत्व देवू शकेल असा कोण पंतप्रधान पदाचा उमेदवार आहे? तुम्ही फक्त एक पंतप्रधान पदाचा उमेदवार घोषित करा, असे आव्हानदेखील त्यांनी विरोधकांना दिले आहे. वाघाला पराभूत करण्यासाठी जंगलातले सर्व प्राणी एकत्र आलेत वाघा ने डरकाळी फोडली की पडून जातात हे होवू नये, अशी इच्छा मुनगंटीवारांनी व्यक्त केली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com