राजकारण
Sudhir Mungantiwar : 'महाविकास आघाडी संपावी असं आम्हाला कधीच वाटत नाही'
उद्धव ठाकरे यांनी काल शरद पवारांची भेट घेतली.
उद्धव ठाकरे यांनी काल शरद पवारांची भेट घेतली. या भेटीच्यावेळी जयंत पाटील, रोहित पवार आणि संजय राऊत आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते. यावरुन आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत.
याच पार्श्वभूमीवर आता सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, महाविकास आघाडीही टिकावी. महाविकास आघाडी संपावी असं आम्हाला कधीच वाटत नाही. शेवटी लोकशाहीमध्ये विरोधकसुद्धा असणं तेवढच महत्वाचे आहे.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, विरोधक म्हणजे जसं निंदकाचे घर असावं शेजारी, तसं विरोधकांचे घर असावं शेजारी. ज्यातून या लोकशाहीमध्ये जनतेच्या हिताचे निर्णय करताना योग्य पद्धतीने निर्णय करताना त्यांच्याही अनुभवाचा फायदा होईल. असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.