मोठी बातमी! नागपूर जिल्हा बँक गैरव्यवहार प्रकरणात सुनील केदार यांना 5 वर्षांची शिक्षा

मोठी बातमी! नागपूर जिल्हा बँक गैरव्यवहार प्रकरणात सुनील केदार यांना 5 वर्षांची शिक्षा

नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळा प्रकरणी काँग्रेस नेते सुनील केदार यांना दोषी ठरवण्यात आले आहे. सुनील केदार यांच्यासह 5 जणांना कोर्टाने दोषी ठरवलं आहे.
Published on

नागपूर : नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळा प्रकरणी काँग्रेस नेते सुनील केदार यांना दोषी ठरवण्यात आले आहे. सुनील केदार यांच्यासह 5 जणांना कोर्टाने दोषी ठरवलं आहे. यानुसार न्यायालयाने सुनील केदार आणि इतर आरोपींना 5 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सोबतच प्रत्येकी 12.50 लाख दंड सुनावला आहे.

मोठी बातमी! नागपूर जिल्हा बँक गैरव्यवहार प्रकरणात सुनील केदार यांना 5 वर्षांची शिक्षा
जम्मू-काश्मीरमध्ये ४ जवान शहीद; मोदी तुमची ५६ इंचाची छाती कुठंय? आंबेडकरांचा सवाल

नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 2002 मध्ये 150 कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा उघडकीस आला होता. तेव्हा सुनील केदार बँकेचे अध्यक्ष होते. याप्रकरणी सुनील केदार, अशोक चौधरी, केतन शेठ, अमित वर्मा, सुबोध भंडारी, नंदकिशोर त्रिवेदी यांना दोषी ठरवण्यात आले आहे. तर इतर तिघांना निर्दोष जाहीर करण्यात आले आहे.

काय आहे प्रकरण?

2001-2002 मध्ये नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने होम ट्रेड लिमिटेड, इंद्रमणी मर्चंट्स प्रायव्हेट लिमिटेड, सेंचुरी डीलर्स प्रायव्हेट लिमिटेड, सिंडिकेट मॅनेजमेंट सर्विसेस आणि गिलटेज मॅनेजमेंट सर्विसेस या खाजगी कंपन्यांच्या मदतीने बँकेच्या रकमेतून सरकारी रोखे (शेअर्स) खरेदी केले होते. पुढे या कंपन्यांकडून कधीच बँकेला खरेदी केलेले रोख मिळाले नाही, ते बँकेच्या नावाने झाले नव्हते. पुढे रोखे खरेदी करणाऱ्या या खाजगी कंपन्या दिवाळखोरीत निघाल्या होत्या. या कंपन्यांनी कधीच बँकेला सरकारी रोखही दिले नाही आणि बँकेची रक्कमही परत केली नाही, असा आरोप आहे. फौजदारी गुन्ह्याची नोंद होऊन पुढे सीआयडीकडे या प्रकरणाचा तपास देण्यात आला होता. 22 नोव्हेंबर 2002 रोजी सीआयडीने कोर्टात आरोपपत्र दाखल केले होते. तेव्हापासून विविध कारणांनी प्रलंबित होता.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com