Supriya Sule : 'त्या' स्टेटसच्या चर्चेवर सुप्रिया सुळेंनी दिलं स्पष्टीकरण, म्हणाल्या...
(Supriya Sule ) आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 26वा वर्धापन दिन आहे. यातच काल सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या व्हॉट्सअॅपला ठेवलेल्या स्टेटसची चर्चा जोरदार सुरू आहे. या स्टेटसमध्ये 'आईला सगळंच माहिती असते, माझे पालक क्वचितच मला सल्ला देतात. आईने मला जो सल्ला दिला, तिच गोष्ट मी रोज स्वतःला सांगते, सहन करायला शिक'
'आपल्या डोळ्यासमोर अन्याय होत असतो, आपण प्रयत्न करत राहायचे. त्यावर आपली बाजू कितीही खरी असली तरी अन्याय होत असतो. आपण काहीही करु शकत नाही. परिस्थिती आपल्या हातात नसते, तेव्हा घट्ट व्हायचं आणि सहन करायचं. कर्तव्य करत राहायचं. आपले संस्कार कधीही विसरायचे नाही. असं सुप्रिया सुळेंनी त्यात म्हटलंय. सुप्रिया सुळे यांच्या या स्टेटसची जोरदार रंगली आहे.
या चर्चांवर आता सुप्रिया सुळे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "माझ्या आईने मला जो सल्ला दिला तो काल मला विमानात बसल्यावर आठवला. तो मी ट्विट केला. माझा वैयक्तिक स्टेटस आहे तो. एका सशक्त लोकशाहीमध्ये स्वत:चे मत मांडणे याच्यात गैर काय आणि एक भावना असते." असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.