Supriya Sule : महाराष्ट्रातून आणखी एक महत्त्वाचा उद्योग बाहेर चालला...

Supriya Sule : महाराष्ट्रातून आणखी एक महत्त्वाचा उद्योग बाहेर चालला...

मुंबईत स्थायिक झालेल्या गुजराती हिरे व्यापाऱ्यांनी आपला इथला व्यवसाय बंद करून सूरतच्या दिशेने स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

मुंबईत स्थायिक झालेल्या गुजराती हिरे व्यापाऱ्यांनी आपला इथला व्यवसाय बंद करून सूरतच्या दिशेने स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे. मुंबईतून हा व्यवसाय गुजरातमध्ये स्थलांतरित झाल्याने महाराष्ट्राला मोठा धक्का बसणार आहे.

याच पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. यातच आता सुप्रिया सुळे यांनी ट्विट केलं आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मुंबईतील हिरे उद्योग आता पुर्णपणे गुजरातला जात आहे. सुरत डायमंड बोर्स या इमारतीत अनेक हिरे व्यापारी स्थलांतरित होत आहेत. महाराष्ट्रातून आणखी एक महत्त्वाचा उद्योग बाहेर चालला असून मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा भाजप कडून सातत्याने प्रयत्न होत आहे.

राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आपले उद्योग धोरण कुठे चुकतेय यांचा आढावा घेणे आवश्यक आहे. सरकारच्या या अशा कचखाऊ वृत्तीमुळे या राज्यातील तरुणांच्या हक्काचा रोजगार राज्याबाहेर जात ही खेदाची बाब आहे. असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com