Sushil Kedia Post For Raj Thackeray : 'मी मराठी शिकणार नाही...' सुशील केडिया यांनी राज ठाकरे यांना पोस्ट करत डिवचलं
महाराष्ट्रातील मराठी भाषेच्या वादाने एका मोठ्या राजकीय आणि सांस्कृतिक वादाचे रूप धारण केले आहे. आता केडियानोमिक्सचे संस्थापक सुशील केडिया सारखे गुंतवणूकदारही या वादात उडी घेत आहेत. त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावर जाहीरपणे जाहीर केले आहे की ते मराठी शिकणार नाहीत.
ठाकरेंना x वर टॅग करत केडिया यांनी लिहिले की, “मुंबईत ३० वर्षे राहूनही मला मराठी नीट येत नाही आणि तुमच्या वाईट वागणुकीमुळे, मी प्रतिज्ञा केली आहे की जोपर्यंत तुमच्यासारख्या लोकांना मराठी माणसांची काळजी घेण्याचे नाटक करण्याची परवानगी दिली जात नाही तोपर्यंत मी मराठी शिकणार नाही. काय करणार ?
मीरा रोड येथील एका दुकानदाराने मराठीत बोलण्यास नकार दिल्यामुळे मनसे कार्यकर्त्यांच्या एका गटाने त्याच्यावर हल्ला केल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर काही दिवसांनी केडिया यांचे हे विधान आले आहे. केडिया यांच्या या विधानामुळे आता सर्वच स्तरात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान सुशील केडिया यांच्या वक्तव्यावर राज ठाकरे यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे आता राज ठाकरे काय उत्तर देणार ? याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.