राजकारण
धारावी पुनर्विकास प्रकल्पासंदर्भात आज ठाकरे गटाचा मोर्चा
उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने धारावी पुनर्विकास प्रकल्पासंबंधी अदानींविरोधात मोर्चाला पोलिसांनी अखेर परवानगी दिली आहे.
उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने धारावी पुनर्विकास प्रकल्पासंबंधी अदानींविरोधात मोर्चाला पोलिसांनी अखेर परवानगी दिली आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून ठाकरे गट 16 डिसेंबरला अदानी समूहाविरोधात मोर्चा काढणार आहेत.उद्धव ठाकरे यांनी या मोर्चाची घोषणा केली.
या मोर्चाला मुंबई पोलिसांकडून परवानगी देण्यात आली नव्हती मात्र आता या मोर्चाला परवानगी मिळाली आहे. ह्या मोर्चासाठी मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी मुंबईत करण्यात आली आहे.
धारावीचा पुनर्विकास करताना 300 चौरस फुटांची घरे देण्यात येणार आहेत. त्याऐवजी 400 ते 500 चौरस फुटांची घरे द्यावीत, ही ठाकरे गटाची मागणी आहे. धारावी झोपडपट्टीच्या पुनर्विकासाचं काम अदानी समूहाला मिळालंय. परंतु याविरोधात आज ठाकरे गटाकडून मोर्चा काढण्यात येणार आहे.