Prashant Koratkar Rolls Royce : प्रशांत कोरटकरकडील 'ती' कार पुण्यातील तुषार कलाटेंकडे?

रोल्स रॉईज् कारचं गूढ: तुषार कलाटेंकडे प्रशांत कोरटकरकडील आलिशान कार सापडली.
Published by :
Prachi Nate

प्रशांत कोरटकरकडे असलेल्या रोल्स रॉईज् कारचं गूढ अखेर उकलल आहे. ती कार पिंपरी-चिंचवडमधील बांधकाम व्यावसायिक तुषार कलाटेंकडे असल्याची माहिती समोर येते आहे. तुषार कलाटेंच्या मुळशी तालुक्यातील फार्म हाऊसमध्ये ही आलिशान कार उभी आहे. त्यासंदर्भातील एक व्हिडीओ समोर आला. त्या व्हिडीओमध्ये WB-02-AB-123 या क्रमाांकाची कार दिसत आहे.

त्याचबरोबर तुषार कलाटे आणि प्रशांत कोरटकरांचा सोबतचा व्हिडीओसुद्धा समोर आला. त्या व्हिडीओमध्ये वादग्रस्त तांत्रिक मनोहर भोसलेही दिसतो आहे. कलाटेंकडे असलेली रॉल्स रॉयज् सातशे कोटींच्या घोटाळ्याचा आरोप असलेल्या महेश मोतेवारच्या समृद्ध जीवन कंपनीच्या नावावर आहे.प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी अटक केल्यानंतर या रॉल्स रॉयज् संदर्भातही त्याच्याकडे चौकशी करण्यात आली. मात्र त्यानं या कारबाबत माहिती देण्यास नकार दिला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com