विधानसभेसाठी राष्ट्रवादीचा पहिला उमेदवार ठरला; अजित पवारांनी फोनवरुन उमेदवारी केली जाहीर
विधानसभेच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया देखील येत असतात. याच पार्श्वभूमीवर आता विधानसभेसाठी राष्ट्रवादीचा पहिला उमेदवार ठरला आहे.
सोळशीच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील उमेदवाराची घोषणा केली आहे. फलटण कोरेगावसाठी दीपक चव्हाणांच्या नावाची घोषणा अजित पवार यांनी केली आहे.
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी फोनवरून आमदार दीपक चव्हाण यांची पुन्हा एकदा उमेदवार म्हणून घोषणा केली असून फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील उत्तर कोरेगाव तालुक्यातील सोळशी ग्रामपंचायतीच्या उद्घाटन समारंभाप्रसंगी त्यांनी ही घोषणा केली.
अजित पवारांनी फोनवरुन दीपक चव्हाणांना उमेदवारी जाहीर केल्याने राजकीय वर्तुळात आता चर्चा रंगल्या आहेत. यासोबतच उमेदवारांच्या नावाची यादी देखील लवकरच जाहीर केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.