राजकारण
पुण्यात भाजप विधानसभेसाठी अॅक्शन मोडवर
विधानसभेच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.
विधानसभेच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. पुण्यात भाजप देखील विधानसभेसाठी अॅक्शन मोडवर आल्याचे पाहायला मिळत आहे.
पुण्यातील भाजपच्या इच्छुक उमेदवारांची नावे केंद्राकडे पाठवण्यासाठी प्रक्रियेला आज सुरुवात होणार आहे. पुण्यातील आठ ही विधानसभा मतदारसंघातील प्रत्येकी तीन नावे आज भाजप प्रदेश आणि केंद्रीय पातळीवर पाठवणार असल्याची माहिती मिळत आहे.
आज पुणे शहरातील उमेदवारांसाठी मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार असून पदाधिकारी मतदान प्रक्रियेतून उमेदवारांची निवड होणार आहे.
केंद्रातून आलेले निरीक्षक पसंती क्रमानुसार तीन नावे प्रदेश भाजपाला पाठवतील आणि तीच नावे पुढे केंद्र स्तरावर पाठवण्यात येणार आहेत.