Suresh Dhas On Jitendra Awhad: आव्हाडांनी केलेलं विधान चुकीचं, आव्हाडांनी केलेल्या वक्तव्यावर सुरेश धस यांचे प्रत्युत्तर

जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यावर सुरेश धस यांची प्रतिक्रिया, बदलापूर प्रकरणातील अक्षय शिंदेच्या बलात्काराच्या आरोपांवर आव्हाडांचे विधान चुकीचे असल्याचे धस म्हणाले.
Published by :
Prachi Nate

बदलापूर प्रकरणावर जितेंद्र आव्हाडांनी एक मोठ वक्तव्य केलं आहे. अक्षय शिंदे याने बलात्कार केलाच नाही, असं महत्त्वाचं वक्तव्य जितेंद्र आव्हाडांनी केलं आहे. तर जितेंद्र आव्हाडांनी केलेल्या वक्तव्यावर सुरेश धस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आव्हाडांनी केलेलं विधान चुकीचं आहे तसेच लोकांचा राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर भरोसा असल्याचं सुरेश धस म्हणाले आहेत.

जिंतेद्र आव्हाड काय म्हणाले

अक्षय शिंदेला मारलं, शासकीय यंत्रणा जेव्हा हस्तेतरित करते तेव्हा पोलिसांना बदनाम केलं जातं... अक्षय शिंदेला ज्या अंतरावरून गोळी मारली ते अंतर बघितल्यानंतर हास्यास्पद वाटतं... त्याच्या हाताला बेड्या होत्या, मग तो कोणता रिव्हॉल्वर काढणार, कोणाच्या खिशातून काढणार?

आता तर हेही सिद्ध झालंय की, त्या रिव्हॉल्वरवर अक्षय शिंदेच्या हाताचे ठसेच नाहीत... लोक का बोलायला घाबरतात, मला माहित नाही... समाज आपल्या अंगावर येईल, हे प्रकरण बलात्काराचं आहे... पण अक्षय शिंदेने बलात्कार केलाच नाही, केलेल्यांना सोडवण्यासाठी अक्षय शिंदेची हत्या करण्यात आली आहे.

याचपार्श्वभूमीवर प्रत्युत्तर सुरेश धस म्हणाले की,

मी त्या मोर्चामधले काही स्टेटमेंट पाहिले, त्याच्यामध्ये जितेंद्र आव्हाड हे पहिल्यापासूनच या मोर्चामध्ये सामिल आहेत.... फक्त त्यांच आजचं अक्षय शिंदे बाबत केलेल स्टेटमेंट मला आवडलेले नाही... मला काय कोणत भांडण करायचं नाही, पण लोकांचा राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर भरोसा आहे, असं विधान सुरेश धस यांनी केलेलं आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com