Uday Samant
Uday Samant

Uday Samant : राज ठाकरे यांची का घेतली भेट? उदय सामंत यांनी सरळ सांगितलं कारण...

उदय सामंत यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

(Uday Samant) उदय सामंत यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतली. उदय सामंत आणि राज ठाकरे यांच्या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. या भेटीनंतर उदय सामंत यांनी माध्यमांशी संवाद साधला. उदय सामंत म्हणाले की, "सकाळी मी माझ्या कामानिमित्त या भागामध्ये आलो होतो. मी स्वत: साहेबांना फोन केला की, आपण असाल तर मी चहा प्यायला येतो. चहा प्यायला आलो. राज साहेबांबरोबर गप्पा मारल्यानंतर काही विषय कळतात, मुंबईच्या विकासाबाबत चर्चा होते."

"राजकीय चर्चा झाली नाही. अतिशय चांगल्या पद्धतीचा चहा प्यायलो, खिचडी खाल्ली आणि निघालो. मुंबई महानगरपालिकेबाबत जर चर्चा झाली असती तर मुंबई महानगरपालिकेबाबत चर्चा झाली असे जाहीरपणे सांगायला काहीच हरकत नाही.

"राजकीय खिचडी हा प्रश्न फारच मोठा आहे तो वेगळा आहे परंतु आज खरी खिचडी खायला मी आलो होतो. त्याच्यामुळे बाकीच्या राजकीय खिचडीची चर्चा करायची काही आवश्यकता नाही. राजकीय सोडून सगळ्या गोष्टीवर नक्की चर्चा झाली, सगळ्या चर्चा झालेल्या सांगायच्या नसतात." असे उदय सामंत म्हणाले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com