आंदोलकांच्या केसांना हात लावला तर अख्खा महाराष्ट्र इथं येईल; उध्दव ठाकरेंचा इशारा

आंदोलकांच्या केसांना हात लावला तर अख्खा महाराष्ट्र इथं येईल; उध्दव ठाकरेंचा इशारा

जालना प्रकरणाचे पडसाद राज्यभरात उमटले असून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. तर, राज्यातील राजकीय वातावरणही चांगलेच तापले आहे.
Published on

जालना : जिल्ह्यातील अंतरवली सराटीमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणी करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. याचे पडसाद राज्यभरात उमटले असून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. तर, राज्यातील राजकीय वातावरणही चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर सकाळपासून आंदोलनस्थळी राजकीय नेते उपस्थिती लावत आहेत. उध्दव ठाकरेंसह अशोक चव्हाण, राजेश टोपे आणि संजय राऊत यांनी आंदोलकांची भेट घेऊन आपला पाठिंबा दर्शवला.

या आंदोलकांच्या केसांना हात लावला तर अख्खा महाराष्ट्र इथं येईल, असा इशाराच उद्धव ठाकरेंनी सरकारला दिला आहे. तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.आमच्या काळात लाठ्या उगारल्या नव्हत्या. मी पंतप्रधान यांना विनंती करतो अधिवेशनात आरक्षण द्या, असेही त्यांनी म्हंटले आहे.

अशोक चव्हाण म्हणाले की, आपल गाव संवेदनशील आहे. आमची भूमिका तिच आहे, एवढ होऊन देण्याचं कारण काय आहे? शासनाने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता तर अशी घटना घडली नसती. आरक्षणासाठी मदत केली नाही. मात्र जखमेवर मीठ चोळले. विशेष अधिवेशनामध्ये कायद्यात बदल करून आरक्षण द्या. आरक्षणावर सरकारने भूमिका स्पष्ट केली पाहिजे. आमचा अंत पाहू नका. समाजाची जी भूमिका तीच आमची भूमिका, असे त्यांनी म्हंटले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com