'वेळ आलीयं, एकत्र येण्याची', म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची सूचक पोस्ट

'वेळ आलीयं, एकत्र येण्याची', म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची सूचक पोस्ट

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे, अशी मागणी सगळीकडे जोर धरू लागली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे, अशी मागणी सगळीकडे जोर धरू लागली आहे. यातच आता अभिनेते महेश मांजरेकर यांनी 'वास्तव में Truth' या कार्यक्रमात राज ठाकरे यांची मुलाखत घेतली.

या मुलाखतीत त्यांना "समजा शिवसेना फुटली, नाही फुटली तर तुम्ही अजूनही एकत्र येऊ शकता का?" असा प्रश्न विचारण्यात आला. यावर राज ठाकरे यांनी त्यांची भूमिका मांडली आहे. यावरुन राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या आहेत.

याच पार्श्वभूमीवर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सोशल मीडियावर सूचक पोस्ट करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये लिहिण्यात आले की, वेळ आलीयं, एकत्र येण्याची, मुंबई आणि महाराष्ट्रासाठी शिवसैनिक तयार आहे, मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी! या पोस्टमुळे आता ठाकरे बंधू एकत्र येणार का? अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com