राजकारण
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी घेतले तुकडोजी महाराजांच्या महासमाधीचे दर्शन
संपूर्ण विश्वाला मानवतेचा संदेश देणारे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा 53 वा पुण्यतिथी महोत्सव अमरावतीच्या गुरुकुंज मोझरी मध्ये त्यांच्या समाधीस्थळी पार पडत आहे.
तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवा निमित्त केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी आज गुरुकुंज आश्रमाला भेट देऊन तुकडोजी महाराजांच्या महासमाधीचे दर्शन घेऊन त्यांना अभिवादन केले. तुकडोजी महाराज हे केवळ विदर्भ किंवा महाराष्ट्रा करिता नाही तर ते देशाकरीता एक प्रेरणेच स्रोत आहे. म्हणूनच त्यांचं राष्ट्रसंत हे नाव त्यांनी धार्मिक विचारां बरोबरच राष्ट्र जागवण्याचं काम त्यांनी केलं आहे. त्यांची भजन आपण कधी विसरु शकत नाही, अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.