ऐश्वर्या राय सारखे रोज मासे खा, चिकने व्हा, मग जिला पटवायचे तिला पटवा; भाजपाच्या 'या' मंत्र्याचं विधान

ऐश्वर्या राय सारखे रोज मासे खा, चिकने व्हा, मग जिला पटवायचे तिला पटवा; भाजपाच्या 'या' मंत्र्याचं विधान

शिंदे सरकारमधील मंत्री नेहमी वेगवेगळ्या कारणानं चर्चेत असतात.
Published on

आदिवासी विकास मंत्री डॉ. विजय कुमार गावित यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. त्यांचे हे विधान चर्चेचा विषय बनलं आहे.

धुळे जिल्ह्यातील अंतूर्ली येथे आदिवासी मच्छीमार बांधवांना मासेमारीचे साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी आदिवासी विकास मंत्री, डॉ. विजय कुमार गावित उपस्थित होते. यावेळी त्यांनी हे विधान केलं आहे.

गावित म्हणाले की, दररोज मासे खाल्ल्यामुळेच ऐश्वर्या रॉयचे डोळे सुंदर आहेत. तुम्हीही दररोज मासे खाल्ले की तुमचेही डोळे सुंदर होतील. जिला पटवायचे तिला पटवूनच घ्याल. असं वादग्रस्त विधान विजय कुमार गावित यांनी केलं आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com