राजकारण
काँग्रेसमधील बंडखोरांना विजय वडेट्टीवारांचा इशारा; म्हणाले...
विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत.
विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत.
निवडणुकांचे बिगुल वाजलं असून विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. राजकीय पक्ष अनेक बैठका, पत्रकार परिषद घेत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता काँग्रेसमधील बंडखोरांना विजय वडेट्टीवारांनी इशारा दिला आहे.
विजय वडेट्टीवार म्हणाले की, बंडखोरांना समजवण्याचे काम करत आहोत. त्यांना माघार घेण्यासाठी आम्ही संपर्क करत आहोत. त्यांना विनंतीही करतो आहोत. जर तेवढे करुन नाही ऐकलं तर पक्षातून बाहेर काढण्याचे कामसुद्घा होईल. महायुतीमध्ये आमच्यापेक्षा अधिक बंडखोरी आहे. असे विजय वडेट्टीवार म्हणाले.